अहमदनगरमहाराष्ट्र

महावितरंच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण

महासंदेश : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे विद्युत विंतरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने मारहाण केली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे, विनायक माणिक साबळे,व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 शिक्रापूर ता. शिरुर येथील विद्युत वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी कर्मचाऱ्यांना थकीत वीजबिल वसुलीचे आदेश दिलेले असल्याने शिक्रापूर विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे, धनंजय गढवे, रुपाली ढोबळे, संगीता कदम, संगीता तरोने हे सर्वजण गावातील थकीत बिले वसुली करत असताना सर्वजन पाबळ चौक येथील एका हॉस्पिटल येथे गेले त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेले तसेच मेडिकलचे वीज कनेक्शन बिल थकीत असल्याने तोडले. यावेळी संजय गव्हाणे व गीतांजली गव्हाणे यांनी विद्युत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी केली दरम्यान याचवेळी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टेमक यांच्या महाबळेश्वर नगर येथील घराचे बिल थकलेले असल्याने सदर बिल भरण्याबाबत विनंती केली. मात्र, तेथे जमलेल्या इसमांनी सर्व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत अडवून धरले तर याचवेळी डॉ. ज्ञानेश्वर टेमक हे त्या ठिकाणी आले व अचानकपणे विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे यांना शिवीगाळ, दमदाटी करत याचा कार्यक्रमच करू असे म्हणून गणेश वगरे यांना धक्काबुक्की करत खाली पाडून मारहाण केली.

याबाबत शिक्रापूर विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश तुकाराम वगरे वय ३४ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पांढरेवाडी ता. पंढरपूर जि. सोलापूर  यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे, विनायक माणिक साबळे यांसह एका अनोळखी व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे हे करत आहे.

Back to top button