अहमदनगर

मांजरसुंब्यात सरपंच पतीची दहशत

एकास जबर मारहाण ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याला विद्यमान सरपंच पत्नीनेच विरोध केला आहे. त्यांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या गावातील समाजसेवकाला सरपंच पतीसह तिघांनी मारहाण केली. नगर तालुक्यातील मांंजरसुंबा गावात ही घटना घडली. डॉ. रामनाथ गोविंद कदम (वय 36 रा. मांजरसुंबा) असे जखमी समाजसेवकाचे नाव आहे.
त्यांच्यावर अहमदनगर शह

रातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान येथील एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द भादंवि कलम 326, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच पती भाऊसाहेब रावसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण शिवाजी कदम व देविदास ऊर्फ पप्पु नारायण कदम (सर्व रा. मांजरसुंबा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी डॉ. कदम यांना लोखंडी गज, कुर्‍हाडीचा दांडा, लाकडी काठीने मारहाण केली. त्यात त्यांच्या पायाला मार लागला आहे.


जिल्हा परिषद निधीमधून मांंजरसुंबा गावात रस्त्याचे काम सुरू असताना ते काम सरपंच पती भाऊसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण कदम व देविदास ऊर्फ पप्पु कदम यांनी बंद पाडले होते. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य देविदास विठ्ठल कदम यांनी डॉ. रामनाथ कदम यांना दिली. डॉ. कदम लगेच रस्ता काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी सरपंच पती भाऊसाहेब कदम, पप्पु ऊर्फ देविदास कदम यांनी डॉ. कदम यांना लोखंडी गज व कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. डॉ. कदम यांच्या पायाला मार लागला आहे. हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या देविदास विठ्ठल कदम यांना किरण कदम याने लाकडी काठीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button