अहमदनगर

मांजरसुंभा ग्रामस्थांतर्फे डॉ.आशा कदम यांचा सत्कार

अहमदनगर : नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील रहिवासी व सध्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील सहायक प्रा.डॉ. आशा भाऊसाहेब कदम यांना नॉव्हेल रिसर्च अकादमी, पुदुचेरी तर्फे बेस्ट वुमन सायंटिस्ट पुरस्कार मिळाला त्यानिमित्त मांजरसुंबा ग्रामस्थांच्यावतीने सरपंच मंगल कदम व सरपंच जालिंदर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. आशा कदम यांनी वनस्पतिशास्त्र या विषयात पीएचडी पदवी संपादन केली असुन त्यांनी २०२०-२१ या वर्षात शैक्षणिक व संशोधनात केलेल्या कार्याबद्दल त्यांना बेस्ट वूमन सायंटिस्ट हा अवॉर्ड देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ कदम म्हणाल्या कि,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही खूप गुणवत्ता असून त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास इंद्रभान कदम, गजानन सावंत, भाऊ कदम, तुकाराम कदम , किरण कदम, भाऊसाहेब कदम, बळवंत कदम, लंकाताई वरखडे, चंद्रभान कदम, अनिल वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Back to top button