देश-विदेशमहाराष्ट्र

मागील काळात असा भेदभाव कधी होत नव्हता पण … !

महासंदेश : राज्यकर्ते येत असतात, जात असतात बदल होत असतात. शेवटी जनतेच्या मनात जे असते जनता त्यांना निवडून देत असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आपण सर्वांनी हे पाहिले आहे. शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले, मागील काळात असा भेदभाव कधी होत नव्हता. पण तो थोडासा जाणवतो आहे.असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील टर्मिनल १ व टर्मिनल २ येथील नियंत्रित प्रवेश मार्ग प्रकल्पाचे भुमिपूजन पार पडले. तसेच मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला सुरूवात झाली आहे. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले की , तोक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. पण काही कारणामुळे पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाला, याचे कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची मागणी काही नसताना देखील, खरंतर मागणी ही नंतर होत असते, परंतु तत्काळ त्यांनी १ हजार कोटी जाहीर केले. महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवे, त्यातही आम्ही समाधानी होऊ. कारण, आम्ही सर्वांनी दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निसर्ग चक्रीवादळाचा विचार करून, कोकणवासीयांना मदत करण्याची भूमिका घेतली.

Back to top button