अहमदनगर

माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उचललेले पाऊल उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी : पद्मश्री पोपट पवार

बहिरवाडीच्या डोंगर माथ्यावर 625 पंचवृक्षांची लागवड

अहमदनगर : माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उचललेले पाऊल उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. माजी सैनिकांनी देश रक्षणाचे कर्तव्य बजावून समाजाप्रती दाखवलेली आस्था प्रेरणादायी आहे. आज निर्सगाचा विचार न केल्यास भविष्यात येणार्‍या संकटात मनुष्याचा देखील विचार होणार नाही. स्वत:च्या असतित्वासाठी मनुष्याने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील भैरवनाथ (खातोडी) डोंगरावर माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने वड, पिंपळ, लिंब, उंबर व बेलचा समावेश असलेल्या 625 पंचवृक्षांची लागवड करण्यात आली. यावेलेई आर्दश पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, लक्ष्मण महाराज कराड, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सरपंच अंजली येवले, रामनाथ शिरसाठ, राजू दारकुंडे, सरपंच शिवाजी पालवे, सरपंच अण्णासाहेब मगर, अशोक आव्हाड, कैलास पटारे, दत्तात्रय जरे, शंकर बळे, गोविंद जरे, रितेश पवार, बंडू पवार, वैभव खलाटे, वनश्री खामकर, जय हिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृती भाबड, शिवाजी गर्जे, संतोष मगर, विष्णू काळे, रवींद्र दारकुंडे, रवी काळे, भरत काळे, राम जगदाळे, राहुल काळे, आण्णासाहेब दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक दारकुंडे, बापू इंगळे, शरद काळे, युवराज काळे, बाबासाहेब दारकुंडे, कृष्णा दारकुंडे, महेश दारकुंडे, देविदास काळे, सचिन दहिफळे, अ‍ॅड. संदिप जावळे, पोपट पालवे, आबासाहेब साळवे, कुशल घुले, संजय मुठे, अनिल ससे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत, देविदास येवले, गोरक्षनाथ काळे, प्रकाश कोटकर, स्वराज्य सैनिक परिवार संगमनेर विकास जगदाळे, बाबा दारकुंडे, संजय येवले, बाबाजी पालवे, बाबा खर्से, राजेंद्र ससे, धर्मराज ठाणगे, अशोक मुठे आदिंसह आजी-माजी सैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी शिवाजी पालवे हे जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहेत. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलविण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. वृक्ष बँकेची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भास्करराव पेरे यांनी माजी सैनिकांनी पंचवृक्ष संकल्पना राबवून डोंगररांगा हिरवाईने फुलविण्यासाठी घेतलेला उपक्रम आदर्शवादी असल्याचे स्पष्ट केले. शिवाजी कर्डिले यांनी आजी-माजी सैनिक समाजाचे भूषण असून, नगर जिल्ह्यात माजी सैनिकांनी मोठी सामाजिक चळवळ उभी केली असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन भाऊसाहेब करपे यांनी केले. शिवाजी गर्जे यांनी आभार मानले.

Back to top button