अहमदनगरमहाराष्ट्र

माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायत राज्यात दुसरी

महासंदेश : माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शनिवारी ऑनलाइन बैठक आयोजित माझी वसुंधरा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कर्जत नगरपंचायतीचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. यावेळी दोन्ही प्रमुख अधिकाऱ्याचा सत्कार आम्ही कर्जतचे सेवेकरी आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला.

    माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने सहभाग नोंदविला होता. मागील अनेक दिवसांपासून राजकीय पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह सर्व सामाजिक संघटना, आम्ही कर्जतचे सेवेकरी तसेच कर्जत शहर आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी कंबर कसली होती. हरीत कर्जत शहरासाठी सर्वांच्या सहकार्याने कर्जत नगरपंचायतीने वृक्षसंवर्धनकरीता मागील अनेक दिवसांपासून मोठी चळवळ उभी केली होती. यासाठी कर्जत शहरातील विविध भागात झाडे लावत अमुलाग्र बदल घडविला होता. शनिवारी या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीमध्ये तर कर्जतहुन प्रांताधिकारी तथा नगरपंचायतीचे प्रशासक अर्चना नष्टे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव ऑनलाइन सहभागी झाले होते. कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यामध्ये केलेल्या कामाचे मूल्यांकन पाहता राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असे जाहीर करण्यात आले.

Back to top button