माय- लेकास दगडाने मारहाण

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर : बाप- लेकाने माय- लेकास दगडाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी तपोवन रोडवरील जयनगरमध्ये घडली. या मारहाणीत निखील पंढरीनाथ पावडे (वय 27 रा. जयनगर, तपोवन रोड) व त्यांची आई जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. निखील पावडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप गर्जे व संदीप गर्जेचे वडिल (पूर्ण नावे माहिती नाही, रा. जयनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निखील पावडे त्यांच्या घरासमोर उभे असताना संदीप गर्जे व त्याचे वडिल तेथे आले. अश्विनी बेग यांच्या घरी जाऊन काय सांगितले, असे म्हणत संदीप याने निखील यांच्या डोक्यात दगड मारला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या निखील यांच्या आईला संदीप याच्या वडिलांनी दगड मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाय. जे. चव्हाण करीत आहे.