Travelअहमदनगरमहाराष्ट्र

मारहाणीसारख्या घटना निंदणीय :ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

कर्मचार्‍यानी  खचून  जाऊ नये! ; प्रशासन कर्मचार्‍यांच्या पाठीशी
नगर, दि.7 (प्रतिनिधी) – महावितरणच्या नगर शहर व ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या तेलीखुंड शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता व जनमित्र यांना 5 फेब्रुवारी रोजी रात्री कार्यालयात  झालेली मारहाण ही निंदनीय असून, या घटनेमुळे अभियंते व कर्मचारयांनी खचून जाऊ नये आणि सदर घटनेचा मी निषेध करीत असून याचा परिणाम ग्राहकांच्या सेवेवर पडू देवू नये, प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे आश्‍वासन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
अहमदनगर शहर उपविभाग क्र. 2 अंतर्गत असणार्‍या तेलीखुंट या शाखा कक्षातील रात्रपाळी ड्युटीवर असणारे कर्मचारी प्रकाश शेळके, बापूसाहेब बडेकर आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र पालवे यांना निखिल धंगेकर या व्यक्तीने शुक्रवारी  रात्री कार्यालयात घुसून मारहाण केली होती. या आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. आणि पोलिसांनी तत्परतेने आरोपीस अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी आज तेलीखुंट कक्ष येथे प्रत्यक्ष भेट देवून, कर्मचार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्याच्यां कडून झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करीत या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. पोलीस प्रशासनाने  गुन्हा दाखल केलेला असून, आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी कायद्याची पुर्णपणे मदत घेत पुढील कारवाई करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून मारहाणीसारखे प्रकार करतात अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांना  कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. महावितरण प्रशासन आपल्या  कर्मचार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून महावितरण कर्मचार्‍यांना कायम संरक्षण देण्यासाठी विचार करण्यात येईल असे तनपुरे यांनी यावेेेळी आश्वस्त केले.
यावेळी अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. एल. भराडे, सहाय्यक अभियंता किरण महाजन, राजेंद्र पालवे, गायकवाड, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष सतीश भुजबळ, शंकर जारकड, विक्रम कोके, शिवा चितळकर, प्रविण जठार, किशोर काळे, अशोक आव्हाड, संदीप जाधव, शरद सोनवणे, अन्सार शेख, पांडुरंग पिसे, कुशल पडोळे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

76 Comments

  1. Is it okay to put a portion of this on my weblog if perhaps I post a reference point to this web page?

  2. Great write-up, I am a big believer in placing comments on sites to inform the blog writers know that they’ve added something advantageous to the world wide web!

  3. There most be a solution for this problem, some people think there will be now solutions, but i think there wil be one.

  4. Great blog here! Additionally your website rather a lot up very fast! What host are you the usage of? Can I get your associate link for your host? I desire my website loaded up as fast as yours lol

  5. it is a really nice point of view. I usually meet people who rather say what they suppose others want to hear. Good and well written! I will come back to your site for sure!

  6. Great blog here! Additionally your website rather a lot up very fast! What host are you the usage of? Can I get your associate link for your host? I desire my website loaded up as fast as yours lol

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button