अहमदनगर

माहिती अधिकार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रल्हाद एडके

अहमदनगर : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जनशक्ती न्यूज चे संपादक प्रल्हाद बन्सीभाऊ एडके यांची निवड करण्यात आली आहे. या आशयाचे नियुक्तीचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि महिती अधिकार संघटना अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस मित्र संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भरत नजन यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उमेश काशीकर, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख कौसरभाई शेख, प्रदेश महामंत्री निजामचाचा पटेल, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष जावळे, जिल्हा प्रवक्ता आर आर जाधव, जिल्हा समनव्ययक अशोक मंडलिक आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button