अहमदनगरमहाराष्ट्र

मुलाकडून आईवडिलास बेदम मारहाण

वृध्द आईचा मृत्यू तर वडिलांची प्रकृती चिंताजनक

अहमदनगर : आज एकीकडे फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात येत आहे.मात्र दुसरीकडे एका मुलाने आपल्या वृध्द आईवडिलास काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उपचारा दरम्यान वृध्द आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या उतारवयात त्यांना कमीत कमी काम व त्यांचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आज बदलत्या काळात देखील फादर्स डे सारखे उपक्रम राबवून त्यांचा सन्मान केला जातो. मात्र एकीकडे हे सर्व करत असतानाच दुसरीकडे आपल्या वृध्द माता पित्यास काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यातील जखमी वृध्द दाम्पत्यास सुरूवातीला पाथर्डी येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र,येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान वृध्द आईचा मृत्यू झाला. तर पित्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

Back to top button