Travelमहाराष्ट्र

मोटार आणि दुचाकीचा अपघात ; दोन ठार तर चारजण गंभीर जखमी

महासंदेश : सध्या राज्यात दिवसागणिक कोरोनाचे संकेत संकट गडद होत असतानाच इतर घटनात देखील नागरिकांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत. मोटार आणि दुचाकीचा अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावर पंढरपूरकडे जाताना दुपारी चारच्या दरम्यान अपघात झाला.

याबाबत सविस्तर असे कि, साताऱ्याहून पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील विखळे येथील मायणीजवळ मोटार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. सूरज राजाराम माळी (वय २७, रा. मायणी मानमोडी ता. खटाव) आणि संतोष किसनराव बिराजदार (४०, रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला तर राजकुमार बिराजदार, ज्योतिराम धनाजी बिराजदार, दत्ता बिराजदार, महेश विठ्ठल झोळकुडे हे तरुण गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Back to top button