अहमदनगर

म्हणून ‘आमच्या दुकानात’ पावसाचे पाणी शिरले!

अहमदनगर: दिल्ली गेट ते सिद्धिबाग दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले, परंतु सदरचा रस्ता हा उंच झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे काम झाले नसल्यामुळे पावसाचेपाणी दुकानात शिरते. त्यामुळे दुकानदारांच्या वस्तू खराब होऊन दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. अजून पावसाचे दिवस सुरू झाले नाही परंतु एका पावसामुळेच दुकानदारांचे खूप हाल होत आहेत. अशी तक्रार आ.संग्राम जगताप यांच्याकडे केल्यानंतर महापालिकेचे इंजि. श्रीकांत निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सदर समस्या जाणून घेतली. तसेच लवकरात लवकर उपाययोजना करून पावसाचे पाणी गटारीमध्ये सोडू, असे आश्वासन गाळेधारकांना दिले. यावेळी गाळेधारक उपस्थित होते.

Back to top button