देश-विदेशमहाराष्ट्र

म्हणून ‘त्या’ डॉक्टरांनी दिले राजीनामे!

महासंदेश : आपल्या व आपल्या कुटुंबीयांना कोरोना झाल्यास त्याचा उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा. यासह इतर विविध मागण्यांसाठी मध्यप्रदेशातील चार हजार कनिष्ट डॉक्टर संपावर गेले असून, यातील तीन हजार संपकरी डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा राजीनामा दिला आहे.
डॉक्टरांनी केलेले हा संप बेकायदेशीर असल्याचे नमूद केल्यानंतर हायकोर्टाच्या निकालाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून डॉक्टरांनी आपापल्या अधिष्ठात्यांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत.
सेवेत असताना आम्हाला किंवा आमच्या कुटुंबीयांना कोरोना झाला तर त्यांच्यावरील उपचारासाठी काही बेड्स राखीव ठेवण्यात यावेत अशी ही त्यांची मागणी होती. या मागण्या राज्य सरकारने ६ मे रोजी मान्य केल्या आहेत. परंतु त्याची अधिसूचना त्यांनी जारी केलेली नाही. त्यामुळे हे डॉक्टर्स संपावर गेले आहेत. त्यांच्या मागण्यांना अन्य राज्यांतील कनिष्ट डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे.

Back to top button