महाराष्ट्र

या जिल्ह्यातील 6 नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली ! वाचा ताजी माहिती

महासंदेश : जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जबदरस्त तडाखा बसला आहे. तर, चिपळुण शहर पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे. यामुळे मदतीसाठी सर्व स्तरांतून ओघ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून, 8 पैकी प्रमुख 6 नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असल्याचे जिल्हा पूर नियंत्रण कक्षाने कळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्‍यातील जगबुडी नदीची पाणीपातळी सध्या 9.80 मीटर इतकी आहे. तिची धोका पातळी 7.00 मीटर इतकी आहे.

चिपळुण तालुक्‍यातून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीनेदेखील रौद्ररूप धारण केले आहे. तिची धोका पातळी 7.00 आहे. ही नदी सध्या 7.80 मीटर पातळीवरून वाहत आहे.

लांजा तालुक्‍यातील काजळी नदीची पाणीपातळी सध्या 18.68 मीटर इतकी आहे. तिची धोका पातळी 18.00 मीटर इतकी आहे.

राजापूर तालुक्‍यातील कोदवली नदीची पाणीपातळी सध्या 9.00 मीटर इतकी आहे. तिची धोका पातळी 8.13 मीटर इतकी आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील शास्र्री नदीदेखील धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. तिची पातळी सध्या 8.60 मीटर इतकी आहे. तर, धोका पातळी 7.80 मीटर इतकी आहे.
तर, याच तालुक्‍यातून वाहणाऱ्या सोनवी नदीनेदेखील इशारा पातळी ओलांडली आहे. तिची धोका पातळी 8.60 मीट असून, तिची सध्याची पाणीपातळी 8.20 मीटर आहे.

दरम्यान, लांजा तालुक्‍यातील मुचकुंदी नदीची पाणीपातळी सध्या काहीशी कमी म्हणजे 4.15 मीटर आहे. पण, या नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या या नदीची पातळी 4.60 मीटर आहे. तर, संगमेश्‍वर तालुक्‍यातील बावनदीने देखील धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. सध्या ही पातळी 12.90 मीटर आहे. या नदीची धोका पातळी 11 मीटर इतकी आहे.

ही स्थिती पाहता, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मदतीसाठी जिल्हा पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात एनडीआरएफची पथकेदेखील कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button