देश-विदेशमहाराष्ट्र

‘या’ ठिकणी एकाच दिवसी पाच जणांचा बळी !

महासंदेश : आता कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. मात्र या लाटेने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तर अनेकांच्या डोक्यावरील आई अथवा बाबा नावाचे छत्र हरपले आहे. तर काहींचा आधारच गेला आहे. कधी नव्हे तेवढे या लाटेने अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून टाकले आहे. एका कुटुंबावर तर त्याच कुटुंबातील पाच सदस्यांचा एकाच दिवशी तेरावा विधी घालण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. आजवर कुठल्याही कुटुंबावर अशी वेळ क्वचितच आली असेल, त्यातही ज्या पाच जणांचा  तेरावा करण्यात आला त्यामध्ये चारजण सख्खे भाऊ होते. ही  एक दु:खद घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. 


याबाबत सविस्तर असे कि, लखनौजवळ असलेल्या इमलिया या पूर्ण गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या लाटेत यादव यांचे संपूर्ण कुटुंब उदध्वस्त झाले. हसत्या खेळत्या कुटुंबातील चार महिला एका क्षणात विधवा झाला. कुटुंबातील एकूण आठ जणांचा अवघ्या २० दिवसांच्या काळात मृत्यू झाला. त्यापैकी ७ जणांचा कोरोनाने तर एका ज्येष्ठ व्यक्तीचा भीतीने मृत्यू झाला. एवढी भयावह घटना घडल्यानंतरही सरकारकडून कुठल्याही सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच कोरोनाची चाचणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग होऊन कुटुंबातील आठ सदस्यांना गमावल्यानंतर आता या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

Back to top button