अहमदनगरमहाराष्ट्र

‘या’ तहसीलच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन..!

अहमदनगर: तहसिलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी कारभारास कंटाळून महसूल व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तब्बल ४१ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने तहसिल कार्यालयासह तालुक्यातील सर्व तलाठी सजांचे कामकाज ठप्प झाले आहे. विविध शाखांची सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशही खोळंबले आहेत. एकतर देवरे यांची बदली करा किंवा आमची तालुक्याबाहेर बदली करा अशी या आंदोलकांची मागणी असून मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोेलन सुरूच राहणार असल्याचे महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे व तलाठी संघटनेचेे अध्यक्ष एस यु मांडगे यांनी सांगितले.

 देवरे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा चौकशी अहवाल बाहेर आला. त्यात देवरे या दोषी आढळून आल्यानंतर ऑडीओ क्लिपमागील सत्य उजेडात आले. त्यापाठोपाठ कर्मचारी व तलाठी संघटनांनी वर्षभरापूर्वी तहसिलदार देवरे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची आठवण करून देत देवरे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास दि. २५ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. कार्यवाही न झाल्याने अखेर बुधवारपासून कर्मचारी व तलाठी संघटनांंनी बेमुदत काम आंदोलनास सुरूवात केली आहे.

Back to top button