अहमदनगर

‘या’ तालुक्यात सलग तीन दिवसांपासून पावसाची बॅटिंग!

अहमदनगर : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मागील तिन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज दुपार नंतर सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या पावसाने फळबागधारक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले.
श्रीगोंदा तालुक्यात गुरूवार पासून सलग तीन दिवस तालुक्यातील आढळगाव, मांडवगण, घोडेगाव, बेलवंडीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनही दिवस सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरदार वारे सुटले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होऊन काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे १ तास मुसळधार पाउस झाला पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मान्सूनचा पाऊस वेळेवर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून खरिपाची पेरणी करण्याकरिता लगबग सुरू झाली आहे. तर आंबा, लिंबू, या फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button