कृषीमहाराष्ट्र

या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन  

महासंदेश : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्ठीकोनातून नागपूर ते मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग सुरु आहे. हा महामार्ग २० जिल्ह्यातून जात असून सध्या विदर्भात या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी महामार्गाबात अनेक तक्रारी प्रशासनाकडे  केल्या आहेत. मात्र, या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

महामार्गाच्या कामामुळे धुळ उडत आहे. धुळीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्थ झाली आहे. प्रशासनाने पंचनामा केला आणि शेतकऱ्यांना तुटपूजी मदत दिली. महामार्गलगत असलेल्या शेतीच नुकसान केवळ ०.५ आर दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे. या संदर्भात पुन्हा पाहणी करून योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या मुरुमाचं देखील अवैध उत्खनन कंत्राटदारानी केलं आहे. अवैध उखनन केल्या प्रकरणी कंत्राटदारांना अमरावती जिल्ह्यात १६ कोटींचा दंड देखील देण्यात आला आहे.

तरी देखील नियमांची पायमल्ली करून उत्खनन करण्यात आलंय. सध्या उत्खनन केलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या खड्ड्यांमुळे जीवतहानीसुद्धा होऊ शकतो. कंत्राटदारांनी नियमबाह्य कामे करण्याचा धडाका सुरू केलाय. अशा कंत्रातदारांवर प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त आहेत. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांच्या चुकीच्या धोरणामुळे पहिल्याच पावसात वाढोना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे तर अनेक शेत खरडून गेली आहेत. यामुळे अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Back to top button