अहमदनगर

‘या’ रस्त्याच्या कामात तात्काळ सुधारणा करा : हर्षदाताई काकडे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन

अहमदनगर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुरू असलेल्या बोधेगाव ते भगवानगड रस्त्याच्या नागलवाडी घाटातील कामात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काकडे यांनी दिला.

यावेळी जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, उपाध्यक्ष संजय आंधळे, राजूभाऊ पोटफोडे, नागलवाडीचे सरपंच ॲड. किरण जाधव, सदस्य संदीप गीते, गोरख खेडकर, किसनराव राठोड, नवनाथ फुंदे, नवनाथ खेडकर, रामजी गीते, बप्पासाहेब बर्डे, ॲड.बाळासाहेब शिंदे,  दुर्गाजी रसाळ, सुनील आव्हाड, अमोल निकम आदि यावेळी उपस्थित होते.

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र भगवान गड व श्री क्षेत्र काशी केदारेश्वर या दोन तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या बोधेगाव ते भगवानगड या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. हे काम धीम्म गतीने सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. त्यातच पावसाला सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम संबंधित विभागाने चांगले व दर्जेदार करून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Back to top button