कृषीदेश-विदेशमहाराष्ट्र

‘या’ राज्यात तो जोरदार ‘बरसणार ‘

महासंदेश: दक्षिण -पश्चिम मान्सून वेगाने पुढे वाटचाल करत आहे. यामुळे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. सोबतच अनेक उत्तरेच्या राज्यामध्ये सुद्धा आकाशात ढग जमलेले आहेत आणि मध्यम पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, देशातील काही राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांत बंगालच्या खाडीवर तयार झालेल्या चक्रवाती अभिसरणामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागानुसार मान्सूनचा वेग २७ जूननंतर आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.हवामान विभागानुसार, जूनच्या अखेरपर्यंत पश्चिम किनार्‍यावर पश्चिमी हवेमुळे वेगवेगळ्या ठिकाणी व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्य सोडून देशात आतापर्यंत पाऊस सामान्यच्या जवळ आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने आपल्या दोन आठवड्याच्या अंदाजात म्हटले आहे की, मान्सूनची प्रगती २७ जूनपासून ३० जूनच्या दरम्यान वाढेल आणि याच्या पश्चिम राजस्थान सोडून उत्तर पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज पूर्व प्रदेशात पश्चिम बंगाल आणि शेजारच्या भागात एक चक्रवाती अभिसरण व्यापक पावसाचे कारण ठरत आहे. पुढील दोन-तीन दिवसात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि उत्तर ओडिसामध्ये मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Back to top button