महाराष्ट्र

या शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले

महासंदेश : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीआणि महसूलमंत्री यांनी पाच दिवसासाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले आहेत. आज सोमवार (५ जुलै ) पासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी सोमवार ते शुक्रवार (५ ते ९ जुलै ) या पाच कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळासाठी देण्यात आली आहे. तथापि पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये,सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत , असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
करोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे निर्बंध घालण्यात आले होते, मात्र सध्या करुणा चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तरी ही नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे,असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button