अहमदनगर

‘या’ शहरात 35 हजार एलईडी दिवे बसविणार!

अहमदनगर – खासगी ठेकेदारामार्फत नगर शहरात 35 हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहे. यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या दोन्ही ठेकेदारांना प्रायोजिक तत्वावर कुष्ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविण्याची मुदत दिली होती, ती पूर्ण झाली असून लवकरच एजन्सीचा अहवाल आल्यानंतर शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्याचा प्रकल्प शहरामध्ये साकारण्यात येणार असून या माध्यमातून मनपाची आर्थिक बचत होणार आहे. तसेच संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी प्रकाशमय होणार आहे. दोघांपैकी जी निविदा योग्य आहे त्यास कार्यारंभ आदेश देण्यात यावा, असे आदेश महापौर वाकळे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. कुष्ठधाम रोडवर प्रायोजिक तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची पाहणी महापौर वाकळे, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, विद्युत विभागाचे प्रमुख आर. जी. मेहेत्रे, रावसाहेब चव्हाण, गणेश बारस्कर, पुष्कर कुलकर्णी, शुभम वाकळे यांनी केली. विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे म्हणाले, शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या दोन ठेकेदरांना प्रायोजिक तत्वावर पथदिवे बसविण्यासाठी मुदत दिली होती. दोन्ही ठेकेदाराने कुष्ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविले असून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button