या ‘स्टार’ क्रिकेटपटूला मिळालं नाही आयपीएल चं मानधन!
महासंदेश : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने बीसीसीआयवर गंभीर आरोप करत १० वर्षांपूर्वीचे आयपीएल मानधन न मिळाल्याचे म्हटले आहे. २०११मध्ये तो तत्कालिन कोची टस्कर्स केरळ संघाचा भाग होता. या काळातील पैसे बाकी राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रॅड हॉजने उघड केले, की आयपीएल २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना अद्याप ३५ टक्के मानधन मिळालेले नाही. बीसीसीआयने ही रक्कम ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगितले होते. आयपीएल सुरू झाल्यापासून ब्रॅड हॉज सात हंगामांकरिता लीगचा भाग होता. त्याने केकेआर, कोची आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. अष्टपैलू खेळाडूने ६६ सामन्यांत १४०० धावा आणि १७ गडी बाद केले.
टेलीग्राफ क्रिकेटच्या नुकत्याच आलेल्या अहवालात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना आयसीसी स्पर्धेचे मानधन न दिल्याचे समोर आले होते. या टीमच्या सदस्यांपैकी कोणाला पैसे मिळाले नसल्याचे प्रकाशकाने उघड केले.