महाराष्ट्र

ये बाबो ! पतीने पत्नीलाच मागितली खंडणी

महासंदेश :  भारतीय संस्कृतीत पती पत्नीचे नाते विश्वासावर असते . मात्र येथे तर पतीने पत्नीचा विश्वासघात तर केलाच शिवाय खंडणी मागुन जिवे मारण्याची धमकी दिली  आहे. त्यामुळे आता नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुझा यापूर्वी  विवाह झाला असून  पहिल्या पत्नी पासुन एक मुलगी आहे. हे सर्व माझ्यापासून  का लपवले असा जाब विचारणाऱ्या दुसऱ्या पत्नीला पत्नीनेच तब्बल २५ लाखांची खंडणी मागितली आहे . हा अनोखा प्रकार पुणे येथे घडला असून,याप्रकरणी वारजे येथे रहाणार्‍या 30 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर असे कि, यातील आरोपी पतीचे यापूर्वीच लग्न झाले असून पहिल्या पत्नी पासुन एक मुलगी आहे.  मात्र ते असतानाही त्याने वारजे येथील पीडित महिलेसोबत लग्न केले. तसेच आपण विवाहित असल्याचे तिच्या पासून लपून ठेवले. मात्र ही बाब ज्यावेळी पीडित महिलेला समजली,तिने त्यास  याबाबत विचारणा केली असता तीला शिवीगाळ करुन मारहाण केली. यानंतर पीडित महिलेशी अनैसर्गिक संभोग करुन पिडीतेच्या  लग्नातील २२ तोळे सोन्याचे दागिने घेवुन अपहार केला. तसेच रात्रीचेवेळी एकांतातील ‘ते ‘फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन पीडित महिलेस  २५ लाखाची खंडणी मागुन निनावी चिट्ठी पाठवुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button