अहमदनगरमहाराष्ट्र

राज्याचे,देशाचे विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता असणारे माणसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये : महंत उद्धव महाराज मंडलिक

महासंदेश : राज्याचे व देशाचे विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता असणारे माणसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत, हे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीने सिद्ध करून दाखवले आहे. त्यातच साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्था या चळवळीच्या अग्रस्थानी राहुन विश्वास संपादन करत सफलतापूर्वक या चळवळीच्या शिरपेचा मध्ये सुवर्ण मुकुट घालण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन संत तुकाराम महाराज मठ नेवासेचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आर्थिक दृष्ट्या नावलौकिक असलेल्या राहुरी फॅक्टरी मुख्य शाखा असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने शंभर कोटी ठेवींचा पल्ला पार केल्याबद्दल ठेवीदारांच्या आभार व आनंद सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये संत तुकाराम महाराज मठ नेवासेचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली व मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडुभाऊ काळे पुणे येथील उद्योजक विजय कुमार सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.
या वेळी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की, अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे तसेच पारदर्शक व जबाबदारीने व्यवहार केल्याने आज संस्था 100 कोटींच्या ठेवींचा पल्ला पार करत आहे आजपर्यंत आम्ही कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाही. संस्थेने आजपर्यंत राष्ट्रीयकृत बँका देत नाहीत तेवढ्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. जवळपास दोनशेेे युवकांच्या हाताला संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. महिला सक्षमीकरणाचे काम देखील संस्था करत आहे अर्थकारणा बरोबरच समाजकारणातही संस्था अग्रेसर आहे त्यामुळेच आजचा हा सुवर्ण दिवस बघायला मिळाला आहे. शंभर कोटी ठेवींची लक्ष पूर्ती ही आमच्या प्रामाणिक अर्थ सेवेची पावती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले की, एखादे काम हाती घ्यावं व ते सफल व्हावे यासारखी मनोधैर्य वाढवणारी दुसरी गोष्ट नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ ही सामान्यांना पत निर्माण करून देत आहे या चळवळीने राज्यालाच नव्हे तर देशाला आपली चुणूक दाखवून दिली आहे. सहकाराची धुरा समर्थपणे सांभाळण्यासाठी संयम सामर्थ्य व नीतिमत्ता हवी असते हेे सर्व या पतसंस्था चळवळीतील नेतृत्व मध्ये आहे. अभिमान वाटावे अशी माणसे याा चळवळीमध्ये आहेत.
अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सांगितले की,शिवाजीराव कपाळे यांनी शांतता संयम श्रद्धा सबुरी सुस्वभावी हे सर्व गुण अवलंबल्याने ते आज 100 कोटींचा टप्पा पार्क करू शकलेले आहेत. त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केलेला आहे. खरं तर ही विश्वासाची पावती आहे. यामागे अपार कष्ट आहेत, हे व्रत त्यांनी पथ्य पाळल्या मुळे यशस्वी होत आहे.
यावेळी उद्योजक विजयकुमार शेट्टी यांनी सभासद व ठेवीदारांचे पैसे योग्य रीतीने संभाळ याबद्दल सर्व ठेवीदारांच्या वतीने कपाळे यांचे आभार मानले त्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल व कपाळे यांच्या दूरदृष्टी बद्दल त्यांचे कौतुक केले. तर कडुभाऊ काळे यांनी आपल्या हास्य शैलीमध्ये सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की स्वप्न बघावे लागतात व ती प्रत्यक्षात उतरावी लागतात ज्याला ध्येय नाही तो माणूस नाही आता ठेवीदार देखील हुशार झाले असून विश्वासाच्या माणसाकडे ते ठेवत आहेत.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन नगरसेवक सचिन ढुस आदिनाथ कराळे राहुरी अर्बन चे चेअरमन रामचंद्र काळे साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे संचालक विष्णुपंत गीते अविनाश साबरे बाळासाहेब तांबे किशोर थोरात बाबासाहेब वाळुंज मेजर राजेंद्र कडू प्राध्यापक दत्तात्रेय वाणी मुकुंद चव्हाण वेदांत कपाळे धीरज कपाळे ,पारस नहार,चांगदेव पवळे,संस्थेचे मॅनेजर सचिन खडके आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठेवीदार सुभाष भंडारी भानुदास सोनवणे रामदास गरड भाऊसाहेब गुंजाळ कांता पाटील कदम नारायण कदम सूर्यकांत कोरडे जगन्नाथ बोराडे अशोक शेजुळ दीपक भावसार इलियास शेख गणेश दळवी संदीप इथापे यांचा देखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केले तर आभार विष्णुपंत गीते यांनी मानले.

चौकट

यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी आषाढी वारी संदर्भामध्ये सुतोवाच करताना सांगितले की आषाढी वारी ही शासनाने सुचवल्याप्रमाणे व्हावी अशी भूमिका आमच्या सर्व संतांची आहे मात्र नको ते सोंग नको ती भूमिका विविध माध्यमातून मांडत आहेत मात्र आम्ही लोकहिताची भूमिका मांडणारे आहोत वारकरी संप्रदायामध्ये घुसून हा संप्रदाय विसकटण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याला योग्य उत्तर देण्याची ताकद या संप्रदायामध्ये आहे असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आम्ही शासना बरोबर आहोत कोणतेही संत आतेताई करणारे नाहीत या आडून कोणी राजकारण करू नयेअन्यथा त्याचे वस्त्र काढून तो खरंच वारकरीआहे का हे शोधावे लागेल वारकऱ्यांना कुणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये.

Back to top button