अहमदनगरमहाराष्ट्र

राज्यात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल

राज्यात नगर जिल्हा गुन्हेगारीत अव्वल
राज्य गुन्हे अन्वेषण विभगाच्या अहवालात स्पष्ट
नगर, दि. 22 (प्रतिनिधी) – राज्यात विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. त्याच पाठोपाठ जिल्हा गुन्ह्येगारीत ही राज्यात अव्वल असल्याचे पुढे आले आहे. नुकतेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र, तसे पहाता जिल्ह्यात पोलीस कर्माचार्‍यांची संख्या खूप कमी असल्याचे पुढे येत आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षाच्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांची गुन्ह्यांचे वर्गीकरण करून जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची आकडेवारी सादर केली आहे. त्यामध्ये एका वर्षात 38 हजार 816 गुन्ह्यांची नोंद एकट्या नगर जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यात नगर जिल्हा अव्वल असल्याचे या आकडेवारीमध्ये समोर आले आहे. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापूरचा नंबर लागतो.
राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे. जिल्ह्यात 45 लाखांहून अधिक लोकसंख्या असून कायदा सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात 30 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. सुमारे तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आणखी पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. दरम्यान, याबाबत श्रीरामपूर येथील व्यापारीच्या खून प्रकरणाची स्थळ पाहणी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी नवीन 500 कर्मचार्‍यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. नगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. अनेक गुन्ह्यात शेजारच्या जिल्ह्यातील आरोपी निष्पन्न झाल्याचेही पुढे आले आहे.त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचाही अंदाज पोलीस वर्तुळात आहे. अनेक गुन्हेगार गुन्हा नगर जिल्ह्यात करतात आणि शेजार्‍याच्या जिल्ह्यात वास्तव्य करतात. त्यामुळे आरोपीला अटक करणसाठी पोलिसांना मोठी शिकस्त करावी लागते.

चौकट…
तीन पोलीस ठाणे अंतिम टप्प्यात : पाटील
नगर जिल्ह्यात पोलीस कर्माचार्‍यांची संख्या कमी आहे. मात्र, कायदा सुव्यवस्थेबाबत कमी कर्मचार्‍यांतही योग्य नियोजन करीत आहोत. तसेच 500 कर्मचार्‍यांच्या प्रस्ताव ही पाठविण्यात आला  आहे. तीन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव ही अंतिम टप्प्यात आहेत, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button