राज्यात मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय खेळी !

‘या’ माजी न्यायामूर्तीची टीका
महासंदेश : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे. संभाजीराजे ज्या मागण्या केल्याचे सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. असा आरोप माजी न्यायामूर्ती कोळसे-पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी न्यायामूर्ती कोळसे-पाटील यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली असून ते म्हणाले की, ज्यावेळी संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग त्यांनी तोंड का उघडले नाही?.
कोळसे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. मराठा समाजाला आरक्षण देणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे. पण ज्यावेळी संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज्य सकारकडे पाच मागण्या केल्या असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन मार्गदेखील सूचवले होते. राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय आहे, रिव्ह्यू पिटीशन टिकले नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावे लागणार आहे आणि ‘३४२ अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटले तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटले तर ते संसदेकडे पाठवतील, आदी तीन पर्याय संभाजी छत्रपती यांनी सरकारला सूचवले होते.