अहमदनगर

रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारास लूटले

अहमदनगर : दुचाकी आडवी लावून अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कचरू पवार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
पवार हे त्यांच्या दुचाकीवरून खंडाळा येथे होते, मात्र श्रीरामपूर रोडचे काम चालू असल्याने ते सुतगिरणीमार्गे एमआयडीसीमध्ये आले एमआयडीसीमध्ये एसटी कार्यशाळेजवळ दुचाकीतील पेट्रोल संपले. म्हणून मोटारसायकल ढकलत पायी घेऊन जात असताना, एका कंपनीजवळ माझ्या समोरून एका एचएफ डिलक्स मोटारसायकलवरून ३ अनोळखी इसम आले व त्यांनी मोटारसायकल आडवी लावून थांबविले.  काही एक न विचारता लाथाबुक्यांनी मारहाण केली व ३२ हजार ४०० रूपये व कागदपत्रे घेऊन शिवीगाळ करून हे तिघे मोटार सायकलवरून एमआयडीसी रोडने भरधाव वेगाने निघून गेले.या बाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

Back to top button