अहमदनगर

रात्री घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी उघडी ठेवली अन ..!

अहमदनगर : सर्व साधारणपणे आपण रात्रीच्यावेळी घराच्या दरवाजाच्या कड्या व्यवस्थित लावतो . कारण रात्रीच्या वेळी कोणी चोरट्याने घरात घुसू नये.
मात्र असेच घराच्या किचनचा दरवाजा देखील बंद करतो. मात्र येथील एकाला रात्रीच्या वेळी किचनचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. रात्रीच्यावेळी अज्ञात चोरटयांनी याच दरवाजातून घरात घुसून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.  
याबाबत सविस्तर असे कि, बागरोजा हाडको येथील रेणाविकर कॉलनीत सिव्हील इंजिनिअर विनोद छगनराव काकडे हे राहतात. विनोद काकडे , त्यांची पत्नी स्वाती व मुलगा अभिषेक असे घराचे वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले होते. तर घराच्या खालच्या हॉलमध्ये त्यां  आई झोपल्या होत्या. दरम्यान  काकडे यांच्या  आई रात्री झोपताना किचनचा दरवाजा बंद करण्याचे विसरल्या होत्या.  नेमका याचा संधीचा फायदा घेत चोरट्यानी घरात घुसून  कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  या प्रकरणी काकडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button