राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती

अहमदनगर राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांची माहिती
अहमदनगर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये बावीस वर्ष युवती काँग्रेस जोमाने काम करत आहे. राष्ट्रवादी पक्ष मध्ये सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी वेगळ्यावेगळ्या सेलची स्थापना करण्यात आली आहे. खा. सुळे यांच्या नेतृत्वामध्ये युवती सेल स्थापन करण्यात आली. त्यामध्ये युवतींना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. युवतींना वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रोत्साहन दिले जाते.
त्यानुसार नगर जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप, आशितोष काळे, किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा महिला अध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हा युवक अध्यक्ष कपिल पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवती पदांसाठी झूम मीटिंगद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये काम करण्यास इच्छुक असणारे युवतींनी उपस्थित राहावे. २७ जून रोजी सायं ५ ते ७ या वेळेत अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या विविध युवती पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे निवडी करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी दिली. नाव नोंदणी व काही समस्या असेल तर खालील मोबाईल नंबर 72180 80886 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.