राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मंगल भुजबळ
अहमदनगर : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र दिल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे व महिला अध्यक्ष कल्पना मानकर यांनी सांगितले.
ओबीसीनच्या न्याय व हक्कांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशपातळीवर काम करत असून, ओबीसीचे अनेक प्रश्न ओबीसी महासंघाच्या माध्यमातून सुटले आहेत .सध्या ओबीसी चे राजकीय आरक्षणा वर ओबीसी महासंघ आक्रमक असून राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलन व निवेदने देऊन तीव्र निषेध नोंदविला आहे. यापुढील काळातही ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी च्या राजकीय आरक्षणावर न्याय मिळेपर्यंत लढा उभारला जाणार असून ओबीसी मधे जनजागृती चे काम करण्यात येणार आहे. मंगल भुजबळ यांना सामाजिक कार्यासाठी यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार व आदर्श युवती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान पाहून व त्यांचा ओबीसी चा अभ्यास पाहून त्यांना संधी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हयातील सामाजिक क्षेत्रातील धडाडीची रणरागिणी म्हणुन त्यांची ओळख आहे. अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी जवळा तालुका जामखेड येथील संगीता हजारे यांची नियुक्ती केली आहे. तर शहर अध्यक्षपदी उज्ज्वला कारंजकर यांची नियुक्ती केल्याचे महिला प्रदेशअध्यक्ष कल्पना मानकर यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.