अहमदनगर

‘राहाता’ नंतर या तालुक्यात घेतला ‘तो’ निर्णय !

अहमदनगर : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थानिक पातळीवर नागरिक निर्णय घेत आहेत. त्यानुसार राहाता तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला होता. आता  पारनेर तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला आहे.
पारनेर तालुक्यामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध खुले करण्यात आल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर, दुकानांत मोठी गर्दी केली. त्यामुळे प्रशासनाने व्यापारी असोसिएशनची बैठक घेतली. या वेळी आठवड्यातून दोन दिवस कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याबाबत चर्चा झाली. चर्चेत व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवस दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवार व शनिवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

कोरोना निर्बंध खुले झाल्यानंतर पारनेर शहरात अनेक दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स, मास्क इत्यादीचे पालन होत नव्हते. काही दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत होते. त्या ठिकाणी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पारनेर शहरातील तीन दुकाने सात दिवसासाठी सील केली.

Back to top button