राहुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

महासंदेश : पत्रकार लोकशाहीचा अधारस्तंभ आहे. परंतु समाजकंटकांकडून अनेकदा पत्रकारांवर हल्ले होतात तसेच अनेक वेळा कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागते यासाठी पत्रकारांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे. आणि त्यादृष्टीने जिल्हा ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून बाळासाहेब नवगिरे यांनी सर्व पत्रकार एकसंघ केल्याने निश्चितच भविष्यात येणार्या अडचणीच्या काळात ग्रामीण पत्रकार संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील त्यांना आधार होईल असे, प्रतिपादन तालक्याचे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगरची राहुरी तालुका पत्रकार संघाने विद्यापीठातील धर्माडी विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजिन करण्यात आले यामध्ये नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी होते तर निवड झालेल्या पत्रकारांना ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे व पत्रकार संघाचे जिल्हा सचिव अनिल कोळसे यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्रीकांत जाधव,जिल्हा कोषाध्यक्ष पदी संतोष जाधव, जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी लक्ष्मण पटारे,तालुका अध्यक्षपदी फेरनिवड गोविंद फुणगे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे,शहर अध्यक्षपदी शरद पाचारने, तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र आढाव, तालुका सचिवपदी आकाश येवले, संघटकपदि संदिप पाळंदे ,तालुका सरचिटणीसपदि कमलेश विधाटे,खजिनदार जावेद शेख,समन्वयक रूषी राऊत,
तालुका संपर्क प्रमुख राजेंद्र म्हसे,
सह सरचिटणीस सचिन पवार,
जिल्हा कार्यकरणी रमेश जाधव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.