अहमदनगर

रुग्णालयातच हणामारी ; तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी

अहमदनगर : रूग्णालयातील फॅन दुरूस्त करण्यासाठी आलेला व्यक्ती व उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा पती यांच्यात हाणामारी झाल्याची घटना सिद्धार्थनगरमधील वैभव क्लिनिकमध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल लक्ष्मण रणसिंग (वय 33 रा. केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू पाटोळे याच्यासह त्याच्या मुलाविरोधात (रा. सिद्धार्थनगर) मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. रणसिंग हे त्यांच्या पत्नीला उपचारासाठी वैभव क्लिनिकमध्ये घेऊन आले होते. उपचार सुरू असलेल्या बेडवर उभा राहून राजू पाटोळे फॅन दुरूस्त करू लागला.

यावेळी रणसिंग यांनी तुम्ही नंतर फॅन दुरूस्त करा, असे पाटोळे याला सांगितले. या रागातून पाटोळे याने रणसिंग यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर राजू शिवाजी पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल लक्ष्मण रणसिंग व त्याच्या मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रूग्णालयात फॅन दुरूस्त करत असताना रणसिंग याने विनाकारण मारहाण केली. तसेच घरी येऊनही पाटोळे यांच्यावर चाकू हल्ला केला. पाटोळे यांच्या पत्नीलाही मारहाण केली असल्याचे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button