अहमदनगर

रुग्णालयातील लाखो रुपयांचे साहित्य केले लंपास!

महासंदेश: शहरातील नवी पेठ येथे असलेले पूर्वीचे ग्रामीण रुग्णालय नवीन जागेत हलविण्यात आल्यानंतर तेथील आवश्यक साहित्य नवीन जागेत नेले होते. परंतु काही साहित्य जुन्याच जागेत होते. तेथून लाखो रुपयांच्या वैद्यकीय साहित्याची चोरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; परंतु उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण होऊन ती पडायला झाल्याने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष असताना हे रुग्णालय धान्य बाजारातील नगरपालिकेच्या अभ्यासिकेत हलविले. तिथे जागा अपुरी असल्याने काही साहित्य ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आले होते. त्यातील एक्स-रे मशीनसारखे किंमती साहित्य चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
इमारतीत स्थलांतर झाले. त्यावेळी जुन्या इमारतीमधील वैद्यकीय साहित्य हलविणे शक्य नव्हते, ते सुरक्षितपणे एका खोलीत ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. त्यामुळे या साहित्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान भुरट्या चोरांनी इमारतीमधील एकेक वस्तू चोरण्याचा सपाटा लावला. लाखो रुपयांच्या वस्तू हातोहात चोरी झाल्या. याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले; परंतु त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार केला. हे साहित्य ज्याच्या ताब्यात आहे, ते पाहण्याची जबाबदारी आहे. संबधितांनी त्याकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष केल्याने राहुरी पोलिसांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पोलिसांना सूचना केल्या, तर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत या घटनेची दखल घेतल्याचे समजले आहे.

Back to top button