Travelअहमदनगरमहाराष्ट्र

वडाची पूजा करायला गेल्या अन सौभाग्य लेणे गमावून आल्या !

अहमदनगर : गृहिणींच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सण वटपौर्णिमा. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारून प्रार्थना करतात. मात्र याच दिवशी पूजेसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सौभाग्य लेणेच चोरट्याने धूम स्टाईल पळवून नेले आहेत.

वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे सौभाग्याचे लेणे दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेले आहे. ही घटना गुरुवारी औरंगाबाद शहरातील महानुभाव आश्रम, समर्थनगरातील सुंदर लॉज आणि एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको महानगरात घडली.
या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वटपौर्णिमेला वडाची पुजा करण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास एमआयडीसी वाळुज, सिडको महानगर परिसरातील गणेशनगर येथील महिला निलीमा मधुकर पोखरकर या पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे गंठण हिसकावून पळ काढला. अर्ध्या तासापूर्वीच पुजेसाठी समर्थनगरातील सुंदर लॉजसमोरुन जात असलेल्या स्वाती सुरेश काळेगावकर यांचे देखील चार तोळे अडीच ग्रॅमचे गंठण अशाच प्रकारे हिसकावले आहे.
याशिवाय पुजेचे साहित्य आणण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिक्षीका कविता दलसिंग घुण या दुचाकीने महानुभाव आश्रम रस्त्यवरुन जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट आलेल्या चोरांंनी कविता यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे गंठण हिसकावले. यावेळी कविता यांनी आरडाओरड केली. मात्र, चोरांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने धुम ठोकली. सुदैवाने कविता या जखमी झाल्या नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button