अहमदनगरमहाराष्ट्र

वन विभागाचा लाचखोर अधिकारी जेरबंद

४० हजारांची मागितली होती लाच  

अहमदनगर :  संगमनेर तालुक्यातील डोळासने येथील एका व्यक्तीच्या शेतीचे निर्वनीकरण करण्याचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी संगमनेरचे फॉरेस्ट अधिकारी विशाल बोर्‍हाडे याने शेतकर्‍याकडे 40 हजार रुपयांची लाचे ची मागणी केली होती. ही रक्कम स्विकारताना बोर्‍हाडे यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकडले आहे.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील एका शेतकर्‍याला त्यांची शेतीचे डी.फॉरेस्ट म्हणजे निर्वनिकरण आहे असा अहवाल हवा होता. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कायदेशीर दृष्ट्या विशाल बोर्‍हाडे यास तक्रारदाराची जमीन निर्वनिकरण आहे, असा अहवाल पाठविण्यास सांगितला होता. त्यानंतर तक्रारदार हा तेव्हा फॉरेस्ट अधिकारी बोर्‍हाडे याच्याकडे गेला, तेव्हा अधिकार्‍यांने लाचेची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी स्थानिक अधिकार्‍यांना विनंती सोडून कोणतीही लालच दाखविली नाही. मात्र, बोर्‍हाडे हा त्याच्याकडून पैसे उकळविण्याच्या विचारावर ठाम होता. त्यामुळे, वारंवार येऊन देखील काम का होत नाही? असे म्हटले असता बोर्‍हाडे याने तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली. जर ही रक्कम मिळाली नाही तर काम होणार नाही. तक्रारदार यांनी  हा सर्व घडलेला प्रकाराची माहिती नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक हरिष खेडकर यांना माहिती दिली. त्यानंतर खेडकर यांचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. त्यानंतर इथे-तिथे करता करता ही 40 हजार रुपयांची रक्कम विशाल बोर्‍हाडे याने पुणे तालुक्यातील आळेफाटा येथे स्विकारली. तेथेच त्यास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 ही कारवाई नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस कर्मचारी विजय गांगूल, रविद्र निमशे, हरुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button