Travelमहाराष्ट्र

वरंधा घाटात बिबट्याचा वावर

वन विभागाने दिला सावधानतेचा ईशारा.
महासंदेश : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील घनदाट जगल परिसरात बिबट्याचा दिवासा ढवळ्या वावर आसल्याचे समोर आले आहे . वरंधा घाटातील महाड च्या हद्धीत घाट रस्त्याने प्रवास करणार्या आनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या घाट मार्गावरुन प्रवास करणार्या आणि पावसाळ्याचे दिवसांत धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येणार्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे, आवाहन भोरच्या उप विभागीय वनाधिकारी, व वन परिक्षेञ अधिकारी दत्ताञय मिसाळ यांनी केले आहे.
वरधा घाटात दिसलेला बिबट्या हा काही एकाच जागी थांबत नाही तो भक्षाच्या शोधात डोंगररानातील जंगलात फिरत असतो. वन विभागाने तिन दिवसांपासून घाट मार्गावार पेट्रोलिंग सुरु केले असून, बिबटूयाचा माग घेत आहेत. घाट मार्गावारील गावकर्यांना या विषयी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले असून तौयांचे पशु धनाचे जर काही नुकसान झाले मानवी हल्ला झाला तर वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते आसे वन परिक्षेञ अधिकारी दत्ताञय मिसाळ यांनी या विषयी माहिती देताना सांगीतले.
वरंधा घाटातील बिबट्याचे दर्शनाने वरंधा घाट भागातिल गावजे नागरिकांमध्ये आणि कोकणात जाणारे येणारे प्रवाशी,पर्यटकांमध्ये भितीचे वातारण निर्माण झाले आहे.

Back to top button