अहमदनगरमहाराष्ट्र

वर्क फ्रॉम होम पुरुषांच्या मुळावर ..

पत्नीकडून पतीचा छळ !

महासंदेश  : आतापर्यंत आपण विविध कारणांसाठी पती अथवा त्याच्या घरातील इतर सदस्यांकडून पत्नीचा शारीरिक अथवा मानसिक छळ केला जात असल्याचे पहिले व ऐकले आहे. परंतु कोरोनामुळे अनेक नवीन तसेच गंभीर प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे या काळात अनेकांना त्यांच्या पत्नीच्या छळाला सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊन काळात कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांना देखील बसली आहे. मागील दीड वर्षात १ हजार पेक्षा जास्त पुरुषांनी त्यांच्या पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. त्याचसोबत महिलांच्याही पती विरोधात दीड वर्षात जवळपास पंधराशेवरुन अधिक तक्रारी आहेत. मात्र यंदा पत्नी विरोधात तक्रारी देण्याचे प्रमाण वाढलं आहे. वर्क फ्रॉम आणि कोरोनाचे  संकट असल्याने लोकं घरातच थांबत आहेत. त्याच नवरा-बायकोचे छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होत आहेत. हे वाद विकोपाला जात आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलहात वाढ झाली आहे.

गेली जवळपास दीड वर्ष कोरोना ठाण मांडून बसला असून अजूनही  तो काही जायचं काही नाव घेईना. त्यात कोरोनाचा वाढत असल्याने  शासन वारंवार लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. अशा काळात घरातून काम केल्यावाचून पर्याय नाही. देशाच्या विविध भागांत लोक वर्क फ्रॉम होम करतायत. पुण्यात तर मोठा औद्योगिक पट्टा आहे. हिंजवडीसारखे देशातील  मोठे आयटी पार्क आहे. त्यामुळे पुणे शहरात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु आता याच वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरे  जावे  लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार पतींनी पोलिसांत पत्नीविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

Back to top button