अहमदनगर

वादळी वाऱ्याने उडाले शाळेचे पत्रे; भिंतीला गेले ‘तडे’..!

‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर : मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र त्याच बरोबर या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वादळी वा-यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाच्या  स्वयंपाकगृह व धान्य कोठीचे ४५ पत्रे उडून पडल्याने ते पुर्णपणे खराब झाले आहेत. जोराचा धक्का बसल्याने भिंतींना मोठ्या भेगा पडल्याने स्वयंपाकगृह बांधकामाचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. जुन्या स्वयंपाकगृहाचे  काही पत्रे  उडून नवीन स्वयंपाकगृहावर पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. धान्य कोठीतील ५ क्विंटल धान्य भिजून खराब झाले आहे.

कोरोनामुळे शाळा व वस्तीगृह सुरू नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या वादळामुळे टाकळी ढोकेश्वर गावातील अनेक लहानमोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

Back to top button