वारसांची फसवणूक करणार्यांवर गुन्हा दाखल करा

ससेवाडी येथील शेतकर्याची एसपींकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- वारसांच्या कोर्या कागदावर सह्या घेऊन त्यामागे मजकूर टाईपकरून ससेवाडी (ता. नगर) येथील दोघांनी वारसांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चौकशी करून त्या दोन व्यक्तींविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ससेवाडी येथील कारभारी अर्जुन ससे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ससेवाडी येथील शेतजमिनीबाबत कारभारी ससे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारसाविरुद्ध अपील दाखल केले असून त्याचे कामकाज चालू आहे. अपीलांचे कामकाज चालू असताना ससेवाडी येथील दोघांनी वारसांचे घरी येऊन व त्यांचे वारसांची फसवणुक करण्यासाठी 31 जानेवारी 2022 रोजी खोटी व बनावट पुरसिस तयार केली. त्या पुरसिसवर 10 जणांच्या कोर्या कागदावर व त्यांच्या फायद्यासाठी वारसांची नावे जमिनीच्या इतर हक्कातुन कमी करण्यासाठी सह्या घेऊन त्याच्या पाठीमागे स्वतःच्या फायद्यासाठी मजकुर टाईप करून घेतलेल आहे. तरी याप्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.