अहमदनगर

विकास कामांना साथ द्या : आ. संग्राम जगताप

सारसनगर वर्धमान कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ

महासंदेश : विद्यार्थ्यांना खेळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी महापालिकेच्या २ एकर मोकळ्या जागेवर सर्व खेळांची मैदाने निर्माण होणार आहेत. विकास कामांचे मूलभूत प्रश्न २० वर्षांपूर्वी नियोजन होणे गरजेचे होते. परंतु कोणीही प्रश्न मार्गी न लावल्यामुळे आता ते करावे लागत आहे. आम्ही पुढील ४० वर्षांचे नियोजन करून एकसंघा द्वारे विकासाची कामे सुरु केली आहेत. त्यामुळे विकास कामांना साथ द्या असे, आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

   सारस नगर वर्धमान कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ आ.जगताप यांच्या हस्ते कराण्यात आला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, महादेव कराळे, नयन चंगेडिया, दिलीप मुथा, राहुल भंडारी, कमलेश पितळे, मनोज लोढा, हर्षल गांधी, निलेश चोरबेले, अमित गुगळे, राखी गुगळे, सुनिता मुथा, प्रिया चोरबेले, राजेंद्र बोरा, संजय कटारिया, विकास सोनवणे,श्रीकांत जाजू, दिलीप  झवर, वर्षा कटारिया आदि उपस्थित होते.

Back to top button