अहमदनगरकृषीमहाराष्ट्र

वीजबिल माफ नाहीच! हवी तर सवलत

अहमदनगर : मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मोठ मोठ्या रकमेची बीजबीले आली होती. त्यावर कळस म्हणजे सरकारने देखील ही बीले भरण्यासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली होती. त्यावर सर्वच स्तरातून तीव्र आवाज उठवण्यात होता. या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी ही बीले भरली होती. परंतू शेतकऱ्यांना बीजबील माफ करावी अशी मागणी पुढे आली होती.त्यावर उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, हवी तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बील हे भरावेच लागेल, वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढे येईल. त्यामुळे सरकार वीजबील माफ करण्याच्या घोषणा केवळ हवेतच विरल्या आहेत.
गाव तांडे जे विजेपासून वंचित आहेत, तिथं वीज पोहोचवण्याचे काम आम्ही हातात घेतोय. काही ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, मात्र आम्ही धोरण ठरवलं आहे, त्यानुसार वीज देऊ, असा निर्धार नितीन राऊत यांनी व्यक्त केला.  

Back to top button