अहमदनगर

वृद्ध महिलेशी गैरवर्तन ; श्रीरामपूरच्या एका इसमा विरोधात तोफखान्यात गुन्हा दाखल

अहमदनगर : नगर शहरातील एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील अनिल निवृत्ती बागूल या इसमाविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत वृद्धेने फिर्याद दिली आहे. सावेडी उपनगरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

याबाबत पिडीताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी सायकांळी अनिल बागूल हा माझ्या घरी आला. दमदाटी करून त्याने मला जवळ ओढले व माझ्याशी गैरवर्तन करून मला सोप्यावर ढकलुन दिले. यानंतर बागूल याने पिडीतासह त्याच्या मुलाला व नातीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बागूल विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.

Back to top button