महाराष्ट्र

वॉण्टेड गुन्हेगार जेरबंद

खंडणी विरोधी पथक 1 ची कामगिरी
महासंदेश : आर्म ऍक्‍ट व इतर गुन्हयामध्ये वॉण्टेड असलेल्या गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने(1) अटक केली. तो लोहियानगर येथे येणार असल्याची खबर मिळाली होती.
विकास गोविंद काबंळे उर्फ थापा (22, रा. लोहियानगरम् हसोबा )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व पाहीजे/फरारी आरोपी यांचा शोध घेतला जात होता. तेव्हा पथकातील पोलिस हवलदार रविंद्र फुलपगारे यांना खडक पोलीस स्टेशन कडील आर्म ऍक्‍ट मधील निष्पन्न पाहीजे आरोपी विकास हा एकबोटे कॉलनी लोहीयानगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव व अंमलदार वांजळे, ओंबासे, फुलपगारे,सोनवलकर, चौधर, पवार यांनी सापळा रचून निष्पन्नविकास यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिली आहे. त्याला पुढील कार्यवाही कामी खडक पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. त्याच्यावर खडक, मार्केटयार्ड आणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Back to top button