अहमदनगर
व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणारा आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर – व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटमार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर येथून ताब्यात घेतला. महेश गोविंद मिसाळ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार संशयित आरोपी महेश मिसाळ हा नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कटके यांनी सापळा रचवून मिसाळ यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, सुनील चव्हाण, योगेश सातपुते यांनी केली.