महाराष्ट्र

व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट कोरोना रुग्णांसाठी आधारवढ: आमदार गोपीचंद पडळकर

महासंदेस : कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत ही व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट हा कोरोना रुग्णांसाठी आधारवढ बनला आहे. मोफत कोविड सेंटर उभारून गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट ने केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट मार्फ़त सायबर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेल इथं उभारलेल्या मोफत कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. यावेळी व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे आणि मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी या मोफत कोविड सेंटर संदर्भातील माहिती सांगितली. यावेळी मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्या माध्यमातून व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट च्या सेंटर मध्ये मोफत रुग्ण सेवा करत असल्याबद्दल आमदार पडळकर यांनी डॉ.निंबाळकर यांचं विशेष कौतुक केले आहे.

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट ने रुग्ण सेवा करून अनेक रुग्णांना जीवनदान दिलं आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक केला आहे. पहिल्या लाटेत सायबर कॉलेज येथे उभारलेल्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड सेंटर मधून जवळपास बाराशे पेक्षा अधिक रुग्ण हे उपचार घेऊन कोरोना मुक्त झाले आहेत. तर दुसर्‍या लाटेत ही व्हिजन च्या माध्यमातून उभारलेल्या कोरोना केअर सेंटर मध्ये आज 600 पेक्षा अधिक रुग्ण हे कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोना काळात रुग्णांची मोफत सेवा करण्याचं खूप मोठं काम हे संताजी बाबा घोरपडे यांच्या माध्यमातून सुरू असून हे कार्य गौरवास्पद … इतरांनीही याची प्रेरणा घेऊन समाजसेवा करावी असल्याचे गौरवोद्गार आमदार पडळकर यांनी काढले.

Back to top button