अहमदनगरमहाराष्ट्र

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांची नियुक्ती करा

नगर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत ठराव

अहमदनगर : आमदार नीलेश लंके यांचे नाव शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरच्या माध्यमातून देशभरात पोहोचले आहे. त्यामुळे शिर्डी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांना संधी द्यावी अशी मागणी नगर-पारनेर तालुक्यातून होत आहे. श्री साई संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा ठराव नगर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीने केला असल्याची माहिती प्रविण कोठुळे यांनी दिली.
आमदार नीलेश लंके यांनी कर्जुले हर्या व भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरच्या (कोविड सेंटर) माध्यमातून हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे. लंके यांच्या कामाची दखल पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह देशातील इतर राज्यांनीही घेतली आहे. त्यांच्या कोविड सेंटरमधून अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील लोक उपचार घेवून घरी गेले आहेत. त्यामुळे समाजसेवा करणारे आमदार लंके यांची श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणीचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे सरपंच प्रविण कोठुळे यांनी सांगितले.

Back to top button