महाराष्ट्र

…शुभमंगल सावधान…. अन नवरी गायब..!

महासंदेश : थाटामाटात लग्न झाल्यानंतर  चक्क दुसर्‍याच दिवशी नववधु पसार झाली आहे. ही घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे.याप्रकरणी फसवणूक  केल्याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रविंद्र पांडुरंग पाटील (वय३४ वडगाव ता. धुळे) या सेंट्रींग कामगाराने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. नेमका याच गोष्टीचा चौघांनी गैरफायदा घेतला. जंग्गु शंकर पगारे, सुनिल शंकर कोळी (रा. जुने धुळे) व एक भारती नामक महिला यांनी फिर्यादीचे ज्योती राजेंद्र शिंदे (रा. मालेगाव) हिच्याशी लग्न लावून देण्याचे ठरवत त्याचा विश्वास संपादन केला. हेलग्न लावून देवून देण्यासाठी फिर्यादीकडून १ लाख १० हजार रूपये घेतले. मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच नववधू मुलगी घरातून निघुन गेली. त्यावरून वरील चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. तपास उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.

Back to top button