अहमदनगरकृषी

शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा अन्यथा ठिय्या आंदोलन करू : मनोज कोकाटे

भाजप नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयास इशारा

अहमदनगर :  नगर तालुक्यातील जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक ताबडतोब थांबवा अन्यथा भाजप नगर तालुक्याच्या वतीने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत महावितरण कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी निवेदनाद्वारे दिला. या मागणीचे निवेदन महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना देण्यात आले.

कोकाटे म्हाणाले, महावितरण कार्यालयाने नगर तालुक्यातील जळालेले रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे काम चालवले आहे. रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी आधी थकीत वीजबिल भरा मगच आम्ही रोहित्र बदलून देऊ, असे अधिकारी शेतकऱ्यांसमवेत बोलत आहे. या बाबत मी स्वतः शहानिशा केली असता सांडवे गावातील शिंदे वस्ती येथील जळलेले रोहित्र बदलून देणे संदर्भात मी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता मला देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून तेच उत्तर देण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर व लाजिरवाणी असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून सद्य परिस्थितीचा विचार करून योग्य ती पाऊले उचलावीत, शेतकऱ्यांना महिन्याचा महिन्याला पगार खात्यात जमा होत नाही, शेतकऱ्यांची दिनचर्या बिघडलेली आहे, असे असताना महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांची थकित वीज बील भरण्यावरून होत असलेली अडवणूक अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाने थांबवी अन्यथा भाजप नगर तालुका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करू असे कोकाटे म्हणाले. 

Back to top button